प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना 10 लाख रुपये वैयक्तिक लाभार्थीसाठी आणि 3 करोड रुपये पर्यंत बचत गटासाठी अनुदान!
या योजनेचा उद्देश म्हणजे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि ग्रामीण उद्योगांना बळकटी देणे. आता बेकरीपासून ते फळ प्रक्रिया उद्योगांपर्यंत विविध उद्योगांमध्ये आपले स्वप्न साकार करा, तेही सरकारी अनुदानाच्या आधारावर!
या योजनेअंतर्गत खालील उद्योगांना 35% अनुदान लागू आहे:
1. बेकरी, बिस्किट आणि ब्रेड उत्पादन
2. चिप्स, नुडल्स, आणि फ्रेंच फ्राईज
3. कोकोनट मिल्क, कस्टर्ड पावडर, आणि डाळमिल
4. विविध तेल निर्मिती (शेंगदाणा, सोयाबीन, करडी इ.)
5. हळद आणि मसाले
6. चॉकलेट, केक आणि आइस क्रिम कोन
7. लोणचे, पापड, आणि खारमुरे
8. चिकन, मटन, मासे प्रक्रिया
9. विविध फळ प्रक्रिया उद्योग
...आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. एक छोटी सुरुवात तुमच्या स्वप्नातील उद्योगाला मोठं करू शकते!
कुणी करू शकतं अर्ज?
1. वैयक्तिक लाभार्थी
2. महिला किंवा पुरुष बचत गट
3. शेतकरी उत्पादक संस्था (FPO)
4. विविध भागीदार संस्था
अर्ज कसा कराल?
आवश्यक कागदपत्रं:
पॅनकार्ड आणि आधार कार्ड
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
बँक पासबुक
ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला
उद्योगाचं नाव आणि कोटेशन
फोटो (जिओ टॅगिंगसह)
महत्वाचं: आपल्याकडे जर उद्योग आधीच अस्तित्वात असेल तर, त्याचं विस्तारीकरणही करता येईल आणि त्यासाठी अनुदान मिळू शकतं.
आता स्वप्न साकारण्याची संधी चालून आली आहे! अधिक माहितीसाठी, आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषि विभागाशी संपर्क साधा.
हाक द्या आपल्या भविष्याला – सुरू करा सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग आणि मिळवा सरकारच्या पाठिंब्यावर संधीचं सोनं!
#PMFME #FoodProcessing #GovtScheme